एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 12 विद्यार्थी पात्र

0
एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 12 विद्यार्थी पात्र

एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 12 विद्यार्थी पात्रएन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाचे 12 विद्यार्थी पात्र

अहमदपूर (गोविंद काळे) : माहे डिसेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने आठव्या वर्गासाठी घेण्यात आलेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या बारा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरून यशाची नेत्र दीपक परंपरा कायम केलेली आहे.
यात वैष्णवी फड 146 गुण, माधुरी मुंडे 121 गुण, सतेज हंगरगे 118 गुण, दत्ता खांडेकर 116 गुण, साधना बेदडे 113 गुण, मुकुंद केंद्रे 113 गुण, वैष्णवी नागरगोजे 108 गुण, सुचिता जाधव 103 गुण, आदित्य तेलंग 98 गुण, प्राप्ती चिंचोळे 95 गुण, बसवेश्वर होनराव 95 गुण, संदेश बंडेवार 81 गुण घेऊन या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले आहेत.
या शिष्यवृत्ती परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण संपेपर्यंत दरमहा एक हजार रुपये असे वर्षाचे 12 हजार रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख संतोष मालवदे,अनंतकुमार चोचंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
या नेत्र दीपक यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यी व मार्गदर्शक शिक्षकांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारी गुरुजी, सहसचिव डॉक्टर सुनिताताई चवळे, प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेंदेवाड, राम तत्तापुरे कार्यालयीन अध्यक्ष सोमनाथ स्वामी ांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!