सुधाकर शृंगारेला मत म्हणजे विकासाला मत – प्रदेश प्रवक्ते गणेश हाके

0
सुधाकर शृंगारेला मत म्हणजे विकासाला मत - प्रदेश प्रवक्ते गणेश हाके

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मत म्हणजे विकासाला मत असे मत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते तथा अहमदपूर विधानसभा निवडणुक प्रमुख गणेश दादा हाके पाटील यांनी येथे व्यक्त केले आहे. गेल्या दहा वर्षात देशाचा ज्या गतीने विकास झालेला आहे या विकासामुळे देशाची प्रतिमा व जगातील उंची वाढलेली आहे आज देश एक समृद्ध राष्ट्र निर्भीड राष्ट्र व आर्थिक विकासाकडे झिपावणारा राष्ट्र अशी प्रतिमा जगात निर्माण झाली आहे हा लौकिक भारताने गेल्या दहा वर्षात कमावलेला असून देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच क्षेत्रात झालेला विकास होय असे मत गणेश हाके यांनी यावेळी व्यक्त केले. सबका साथ सबका विकास सबका प्रयास व सबका विश्वास या धरतीवरती सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा विश्वास प्राप्त करून सगळ्यांच्या प्रयत्नाने माननीय मोदी साहेबांनी आपल्या देशाचा विकास केला आहे येत्या निवडणुकीतही आपल्याला देशाचा विकास हवा असेल तर माननीय मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात येणे गरजेचे आहे त्यासाठी लातूरचा खासदार म्हणजे सुधाकरराव शृंगारे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने कोणत्याही खोट्या आफवानां बळी न पडता फुकटची आश्वासने देऊन काँग्रेस मत मागत आहे. सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही कारण काँग्रेसचे कारकीर्द ही भ्रष्टाचार आणि बडबडली होती त्यामुळे विकासावरती काँग्रेस कधीच बोलत नाही जात पात धर्म यावरती मत मागून काँग्रेसने अनेक वर्ष या देशात सत्ता केली परंतु आता या देशातील जनता जागृत झालेली आहे. चांगलं वाईट ओळखायला लागलेली आहे आणि म्हणूनच दहा वर्ष माननीय नरेंद्र मोदी यांना देशाने सत्ता सोपविली होती म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधाकर शृंगारे यांना प्रचंड मताने निवडून देऊन देशाच्या विकासात आपलाही वाटा ,सहभाग द्यावा असे आव्हान गणेश हाके यांनी केले आहे .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!