डॉ. वैभवी तत्तापुरे यांना दीक्षांत सोहळ्यात एम बी बी एस ची पदवी प्रदान

0
डॉ. वैभवी तत्तापुरे यांना दीक्षांत सोहळ्यात एम बी बी एस ची पदवी प्रदान

अहमदपूर (गोविंद काळे) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र सभागृहात सन 2018 च्या शिवरत्न बच ची डॉक्टर वैभवी रामलिंग तत्तापूरे हिला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुक्रे यांच्या हस्ते दीक्षांत सोहळ्यात एम बी बी एस ची पदवी प्रधान करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विभागी यआयुक्त डॉ. भास्कर मुंडे, महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉक्टर एम एस बेग, उप अधिष्ठाता डॉक्टर प्रसाद देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबडे यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ .वैभवी तत्तापूरे ही यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापूरे आणि संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक आशा रोडगे यांची कन्या आहे. या नेतृदिपक यशा बद्दल वीर मठ संस्थांनचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज, आचार्य गुरुराज स्वामी, टागोर शिक्षण संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, सचिव प्राचार्य रेखा तरडे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, शिवकुमार सोनटक्के, ओम भाऊ पुणे यांच्यासह मित्रपरिवारानी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!