परचंडा येथे श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न आदर्श ग्रामपंचायतीचा उपक्रम

0
परचंडा येथे श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न आदर्श ग्रामपंचायतीचा उपक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने आदर्श गाव परचंडा येथे भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री रोकडोबा संस्थान अध्यक्ष ह भ प श्री किशन महाराज, अहमदपूर तहसीलचे तहसीलदार साहेब पालेपाड साहेब, सरपंच शिवनंदा हिप्परगे, गोपीकिशन जी काबरा, जीवन जी कापसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.ग्रामपंचायतीकडून रक्तदान शिबिर घेण्याचे तिसरे वर्ष आहे. रक्तदात्याचा श्री रोकडोबा महाराजांचा फोटो व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिराला प्रति वर्षाप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी श्री रोकडोबा युवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली. लातूर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. ब्लड बँकेचे तिडके आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed