यशवंत विद्यालयात कामगार दिन उत्साहात साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

0
यशवंत विद्यालयात कामगार दिन उत्साहात साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत विद्यालयात एक मे अर्थात महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. ध्वजारोहण प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालाची घोषणा संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांनी केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गजानन शिंदे, उपप्राचार्य प्रा. मुजमील सय्यद, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, राम तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. सोहळ्याचा अध्यक्षीय समारोप डॉक्टर अशोक सांगवीकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार आर व्ही पाटील यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *