तहसील प्रशासनाच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅली
तहसील प्रशासनाच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅली
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये लातूर जिल्हातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने दि.५ मे रोजी सकाळी ९:३० वाजता यशवंत विद्यालय येथून अहमदपूर शहरात भव्य दिव्य स्वरुपात रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आले.
अहमदपूर चाकूर मतदार संघात लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार शिवाजी पालेपाड,पोलिस प्रशासनातील सहाय्यक पोलीस अधिक्षक नवदीप अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिक्षक मनीष कल्याणकर,पोलीस उपनिरीक्षक
रमेश आलापुरे,निवडणूक बंदोबस्त मधील १५५ पोलीस बांधव,गटविकास अधिकारी अमोलकुमार
आंदेलवाड,गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकडे,वैद्यकीय अधिकारी डाँ.नरहरी सुरनर,नायब तहसीलदार मुनवर मुजावर,तुकाराम बनकर,दिगंबर स्वामी,रश्मिता शाहू ,मधुकर क्षीरसागर,अक्षय मेत्रे,अंगणवाडी कार्यकर्ते,सुपरवाझर शोभा घोडके,लिनेस क्लबचे सदस्या,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,स्वीपचे सदस्य
महादेव खळुरे,शिवकुमार गुळवे,
मोहन तेलंगे,बसवेश्वर थोटे,
नागनाथ स्वामी,सौ.अर्चना माने,
पुरुषोत्तम काळे,प्रमोद हुडगे,धनंजय नाकाडे,यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,तहसील कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रशासनाने शहरात सराफा मार्केट,आझाद चौक,पोस्ट ऑफिस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते तहसील कार्यालय या दिशेने भव्य दिव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
मतदार रॅलीचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे,सहाय्यक पो.अ.नवदीप अग्रवाल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
उपस्थितीत मान्यवरांचे विद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले.मतदार जनजागृती साठी घोषणा देत शहरात भव्य रॅलीचे दर्शन घडविण्यात आले.रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रास्तविक प्रा.विश्वंभर स्वामी तर सुत्रसंचलन डाँ.बालाजी कारामुंगीकर व आभार महादेव खळुरे यांनी मानले.
