बोगस कागदपत्र दाखल करून २२ वर्षे नोकरी; शासनाची फसवणूक

0
बोगस कागदपत्र दाखल करून २२ वर्षे नोकरी; शासनाची फसवणूक

बोगस कागदपत्र दाखल करून २२ वर्षे नोकरी; शासनाची फसवणूक

पाठराखण करणारा अधिकारी कोण? उत्सुकता शिगेला!

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नगर परिषदेतील एका कर्मचाऱ्याने दहावी पासचे बोगस गुणपत्रक दाखल करून नोकरी व पदोन्नती मिळवून जवळपास २२ वर्षे सेवा करून, शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आला असून एका तक्रारदाराच्या तक्रारीवरून या बोगस कागदपत्र दाखल करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. त्या कर्मचाऱ्यांनी पदोन्नती मिळवून शासनाची फसवणूक तर केली आहेच, उलट त्या कर्मचाऱ्यांची पाठराखण करणारा वरिष्ठ अधिकारी कोण? हा प्रश्न शहरातील गल्लो-गल्ली चर्चीला जात असून त्या अधिकाऱ्याचे नाव ऐकण्याची उत्सुकता शहरवासीयांत शिगेला पोहोचली आहे.

 याबाबत पोलीसातून  मिळालेली अधिकृत माहिती अशी की शहरातील धर्मराज सदाशिव केंद्रे यांनी दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी मा. जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना तक्रार देऊन, त्या तक्रारीत नमूद केले आहे की अहमदपूर नगर परिषदेचे कर्मचारी सय्यद पाशा सय्यद अली हे दि. १७ जून २००२ पासून न प कार्यालयात कर्मचारी असून त्यांनी नोकरी मिळवताना शैक्षणिक पात्रता नसताना बोगस कागदपत्रे दाखवून नोकरी व पदोन्नती घेतली आहे. त्या कर्मचाऱ्यास व त्याचा पाठीराखा अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी तक्रार केली होती. 
 सदर तक्रारी संदर्भात जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग लातूर यांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी अहमदपूर नगर परिषदेला अहवाल सादर करण्यास कळविले असता मुख्याधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रानुसार दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी नमूद कार्यालयास अहवाल सादर केला. त्या अहवालात सय्यद पाशा सय्यद अली हे १० वी  उत्तीर्ण असल्याचे नमूद करून, त्याची द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन नागपूर डिव्हिजन बोर्ड नागपूर चे दहावी उत्तीर्णचे गुणपत्रक सत्यप्रत करून सोबत जोडून पाठवले.
या अहवाला सोबत असलेल्या इतर कागदपत्रांची जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद कार्यालय लातूर यांनी तपासणी केली असता, दि. १४ ऑक्टोबर २००८ रोजी सय्यद पाशा सय्यद आली यांनी नेमणुकीच्या वेळी दाखल केलेले उपरोक्त गुणपत्रक बनावट असल्याने त्यांना वर्ग ३ या पदावरून पदावन्नत करून वर्ग ४ या पदावर नेमणूक केली असल्याचे दिसून आले. 
विशेष म्हणजे सदर नगरपरिषद कार्यालयाने पदोन्नतीच्या वेळेस गुणपत्रक नकली असल्याचे जिल्हा सह आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले नाही ही बाब उघडतीस आल्यानंतर नमूद कार्यालयाने दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजीच्या पत्रामुळे सय्यद पाशा सय्यद अली यांना लिपिक पदावर देण्यात आलेली पदोन्नती रद्द केली आहे. 
दिनांक 20 सप्टेंबर 2023 6 ऑक्टोबर 2023 आणि 15 डिसेंबर 2023 च्या पत्रानुसार धर्मराज सदाशिव केंद्रे यांनी तक्रारी अर्ज वरिष्ठाकडे देऊन उपरोक्त दहावी उत्तीर्ण गुणपत्रकाच्या आधारे सय्यद पाशा आली यांचे चुकीच्या पद्धतीने खोटी कागदपत्रे दाखल करून समावेषण झाल्याचे त्यांनी त्याच्या अर्जात नमूद केले होते यावरून उपायुक्त नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा सह आयुक्त कार्यालय नगरपरिषद प्रशासन कार्यालय लातूर यांना संबंधित प्रकरणातील केलेल्या कार्यवाही बाबत विचारणा केली असता जिल्हा सहआयुक्त कार्यालय यांनी दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी संबंधित प्रकरणावरती कायदेशीर सल्लागार अडवोकेट गणेश कदम यांच्या पत्रकानुसार दोशी कर्मचारी व पाठराखण करणारा अधिकारी यांच्यावर कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना दिले. 
वरील आदेशाप्रमाणे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी नगर पालीकेचे कर्मचारी चंद्रकांत भदाडे करनिर्धारक यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले त्यानुसार त्यांनी अहमदपूर पोलिसात वरील बनावट कागदपत्र दाखल करून नोकरी पदोन्नती मिळवणाऱ्या कर्मचारी सय्यद पाशा सय्यद आली याच्या विरोधात अहमदपूर पोलिसात फिर्याद दाखल केली असता अहमदपूर पोलिसांनी सय्यद पाशा सय्यद अली यांच्या विरोधात गुरनं 213 / 2024 कलम 406 415 417 463 464 465 467 468 470 471 भादविप्रमाणे गुन्हा दाखल केला असुन  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के एस पठाण हे करत आहेत.   

अजब गाव गजब कर्मचारी

बोगस कागदपत्राचा प्रकार नवा नाही ही बोगस प्रमाणपत्रे न प च्या निदर्शनास येऊन बरीच वर्ष झाली तरी पण झरितला स्थानिक शुक्राचार्य ऑफिस ओ एस होता तो या बोगस कागदपत्रांवर पदोन्नती अन नौकरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता माजी मुख्याधिकरी यांनी हा शुक्राचार्य हटवला अन कारवाई झाली आज सुध्दा खोट्या अन बोगस कागदपत्र आधारे काही कर्मचारी नौकरी करत आहेत अशी जनतेत दबक्या आवाजात चर्चा आहे ते खरेतर कंत्राटी कामगार आहेत पण ते मागच्या दाराने पदावर आहेत ते स्थानिक नागरिक आहेत अन त्यांच्या दबदब्याला स्थानिक नेते ही घाबरतात म्हणुन कोणी तक्रार देण्याची हिम्मत करत नाही.
आता संपुर्ण कर्मचाऱ्याची कागदपत्रे, नियुक्ती, बदली या बाबतीत न प उप आयुक्त ऑडिट पडताळणी कारवाई करतात का हा खरा प्रश्न आहे बदलीस पात्र स्थानिक कर्मचारी पंधरा वीस वर्षे झाली हालत नाहीत या बाबत ही उप आयुक्त साहेब करवाई करतील का हा ही प्रश्न नागरिकां पुढे आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!