किलबिल शाळेचा CBSE बोर्डाचा पहिल्याच वर्षात 100% निकाल ..!!

0
किलबिल शाळेचा CBSE बोर्डाचा पहिल्याच वर्षात 100% निकाल ..!!

किलबिल शाळेचा CBSE बोर्डाचा पहिल्याच वर्षात 100% निकाल ..!!

अहमदपूर (गोविंद काळे) : नुकताच CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून, त्यामध्ये शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कु.अऐमन खादर शेख 93.40% गुण घेऊन शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तर सम्यक रूपसेन कांबळे या विद्यार्थाने 91.40% गुण घेऊन द्वितीय तर शंभूराजे सचिन काटे 90.60% गुण घेऊन सर्व तृतीय व त्याचबरोबर अनुजा महावीर बुजारे 90.40% गुण घेऊन चौथा तर कनक मयूर जाजू व सायली राजेश्वर पाटील यांनी प्रत्येकी 90.00% गुणासह पाचव्या क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादित केले. शाळेचे एकूण 46 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह तर 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. सदरील बोर्ड परीक्षेमध्ये शाळेचे एकूण 68 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना परवेज शेख, राजेंद्र परगे, बालाजी भोगे, सद्दाम हुसेन, प्रकाश कांबळे, प्रतिभा सूर्यवंशी, आकाश कुमार, रोमिओ सर आदी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले, कार्यालयीन अधिक्षक सचिन जगताप, समन्वयक लक्ष्मण थोटे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!