ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमी च्या विद्यार्थ्यानी केले महाराष्ट्राचे नेतृत्व
ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमी च्या विद्यार्थ्यानी केले महाराष्ट्राचे नेतृत्व
केडगाव चौफुला – गोवा पणजी येथे झालेल्या नॅशनल बँडी स्केटिंग(स्केटिंग हॉकी) मिरामार येथे संपन्न झाल्या त्या स्पर्धा गवरमेंट युथ हॉस्टेल मिरमार येथे होत्या या स्पर्धे मध्ये भारतातील एकूण १0 राज्य सामील झाले होते. त्यात पंजाब, हरियाणा, राजस्थान गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू महारष्ट्र या राज्यांनी सहभाग नोदवला या मध्ये आपल्या केडगाव चौफुला येथील
ग्रेट स्पोर्ट्स ॲकडमी च्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्राचे नेतृत्व करत या स्पर्ध मध्ये नावीन्य पूर्ण प्रावीण्य कामगिरी केली. या मध्ये सुवर्ण पदक कु.श्रद्धा सोमनाथ दळवी व कू.द्रिषा रोहन कुंजीर रौप्य पदक कू.चैतन्य कलीचरण शितोळे कास्या पदक कू.आर्यन कुंभार कू.दिग्विजय दिवेकर कू.राजवीर दळवी कू.रुद्रांश लोखंडे कू.ओम तांबे कू.अंश यादव कु.शितिज कुंभार कू.ओजेस शेळके कुं.ओम पवार या मुलांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करत भारतामध्ये आपले नाव लौकीक केले.
हा खेळ साध्य खेलो इंडिया आणि ओलंपिक सारख्य जागतिक पातळीवरील खेळला जातो या मध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलांची प्रगती दैदिप्यमान आहे या मुलांना भविषा मध्ये या स्पर्धा पण खेळता येतील व हीच मुले पुढे देशाचे नाव उंचावरील घेऊन जातील असे मत समाधान दाने सर यांनी मांडले. या सर्व विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन समाधान दाने सर, गणेश घुगे सर व आकाश कसबे सर ,यश बारवकर सर यांनी केले यश संपदान करणाऱ्या मुलांचे कौतुक विजय तिपुगडे सर संदीप टेगले सर शरद पवार सर, डॉ लोणकर व समस्थ दौंड केडगाव चौफुला ग्रामस्थांनी केले. व पुढील वाटचाली साठी शुभेच्या दील्या.
