सीबीएसई दहावीच्या परिक्षेत सुनेगाव( शेंद्री) येथील शुभम जायभाये याला ९७.४० टक्के गुण
सीबीएसई दहावीच्या परिक्षेत सुनेगाव( शेंद्री) येथील शुभम जायभाये याला ९७.४० टक्के गुण
अहमदपूर( गोविंद काळे) : नुकताच सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल लागला असून अहमदपूर तालुक्यातील मुळचा सुनेगाव ( शेंद्री) या ग्रामीण भागातील विद्यार्थी शुभम पुंडलीक जायभाये हा विद्यार्थी आपल्या आई – वडीला सोबत बल्लारपूर तहसील जि चंद्रपूर देहली गावात राहत असुन तेथेच असलेल्या मॉन्टफोर्ट उच्च माध्यमिक विद्यालयाचा सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावी परीक्षेत शाळेतून ९७.४० प्रश्नांसह प्रथम क्रमांक पटकावला असुन चंद्रपूर जिल्ह्यातुन दुसरा क्रमांक पटकावला आहे शुभमचे वडील पुंडलीक रामकिशन जायभाये हे बल्लापूर येथे वनपाल म्हणुन नौकरी करतात या यशाबद्दल सुनेगाव ( शेंद्री) शेनी ग्रामपंचायत सरपंच सौ उषा जायभाये, सामाजिक कार्यकर्ते राम जायभाये, गोपीनाथ जायभाये पत्रकार गोविंद काळे, डॉ रूपेश थगनर, माजी प्रा. शिवदास थगनर, माजी प्रा. अशोक जायभाये , श्रीकांत केंद्रे, शिवाजी काळे, मोतीराम जायभाये आदी सह गावकऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा देऊन गावात पेढे वाटून फटाके फोडून आंनद उत्सव साजरा केला शुभम वर सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत असुन त्याला उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी कोटा राजस्थान येथे पाठवण्यात आले आहे.
