दहावीच्या १९९६ ची वर्गमित्रांचा २८ वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

0
दहावीच्या १९९६ ची वर्गमित्रांचा २८ वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

दहावीच्या १९९६ ची वर्गमित्रांचा २८ वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

विदेशातील मित्रांनेही स्नेह मेळाव्यात आँनलाईन नोंदवला सहभाग

अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांने मित्र मैत्रिणींनीसह २७ वर्षानंतर एकत्रित येऊन शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांना स्नेह मेळावा पार पाडला. शहरातील प्रसाद मंगल कार्यालयात १९९६ मध्ये यशवंत विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतलेल्या वर्गमित्रांची २७ वर्षानंतर भेट झाली. यावेळी आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे हे होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांना शिकवलेल्या एस. एस.भातांब्रे,कलावती भातांब्रे, ए.एन.कोंडापूरे, बी. एम. दहिटणकर,पंढरीनाथ बिलापट्टे, एस. व्हि. होनराव, शिवानंद भेटे, शकुंतला यणगे, व्ही.आर.साबळे, एम. आर. पाटील, बालाजी कोटलवार, विश्वनाथ पगडले,एम.एल. कांबळे, करंजकर, बी.सी. स्वामी, सतीश होनराव, इ. झेड, गोंटे, बालाजी लांडगे,राजेंद्र सूर्यवंशी या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. वर्गमित्रांनी
शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी वर्गमित्रांनी व्यासपीठावर जाऊन एकमेकांचा परिचय दिला. यावेळी गीतगायन, कविता, भाषण आदी विविध कला गुणदर्शनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. मेळाव्यात ८० वर्गमित्र सहभागी झाले. त्यात तहसीलदार गोविंद यरमे,डॉ. प्रवीण सांगवीकर,डॉ.मंगेश कांगणे,संतोष मद्देवाड,स्वप्नील व्हत्ते,प्रदीप गुंडाळे,सचिन पाटील,सुनिता मोरे,मोनिका जाजू,मिनाक्षी ढेले,श्रद्धा दुबे यांची उपस्थिती होती.
खरे तर वयाच्या १५-१६ व्या वर्षी विखुरलेले सर्वजण आज चाळीशी पार झाल्यानंतरच एकत्र भेटणे.सुमारे २७ वर्षांनंतर भेटलेले मित्र त्यांच्या आठवणी उजाळा देत गेट टुगेदर साजरा केला.
यावेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे काहीतरी समाजोपयोगी कार्य करावेत असे स्नेह सोहळ्यात गुरुजणांनी सल्ला दिला.एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.भोजनानंतर फोटोसेशन आटोपलं लगेच सगळ्यांची निघायची गडबड सुरु झाली. सर्वांनाच घरी जायची घाई होती.पण कुणाचाही पाय निघत नव्हता.रेंगाळणारे जड पावले गाड्यांमधे परतत होती.डोळे भरुन जड पावलांनी सभागृह सोडून एकमेकांना निरोप दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक वलसे ,संतोष पाटील,अमित रेड्डी,विलास शेट्टे,रणजीत चौधरी,चद्रशेखर भालेराव,अमोल मेनकुदळे व सचिन खानापूरे या मित्रांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!