यशवंत विद्यालयाचे शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश
यशवंत विद्यालयाचे शालांत परीक्षेत नेत्रदीपक यश
यशवंत विद्यालयाचे 100% चे पाच विद्यार्थी
अहमदपूर (गोविंद काळे) : मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशवंत विद्यालयाचे 100% चे पाच विद्यार्थी असून त्यांनी गुणवत्तेत नेत्रदीपक यशाची परंपरा कायम केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे. शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 514 विद्यार्थी बसले असून त्यापैकी 511 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेचे 90% च्या पुढचे विद्यार्थी 136 आहेत. यात विशेष प्राविण्य 306, प्रथम श्रेणी 154, द्वितीय श्रेणी 45, तृतीय श्रेणी सहा असून विद्यालयाचा सरासरी निकाल 99.41 असा विक्रमी लागलेला आहे. शंभर टक्के घेतलेले गुनानुक्रमे शाळेचे पाच विद्यार्थी आहेत.
अहमदपूर तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान कुमारी देशमुख दीप्ती अजय हिने मिळविला असून कुमारी भगत सायली श्याम, मुंडे आदित्य अशोक, कुमारी येरमे अदिती लक्ष्मण, कुमारी शेटकार नम्रता नितीन या मुलांना शंभर टक्के गुण पडलेले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यां नेत्र दीपक यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी, अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव डॉक्टर सुनिता चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड, राम तत्तापुरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.
