ढगेज् इंग्लिश अकॅडमी ही गुणवत्ता व संस्काराचे केंद्र – अभिजीत देशमुख
ढगेज् इंग्लिश अकॅडमी ही गुणवत्ता व संस्काराचे केंद्र - अभिजीत देशमुख
लातूर (प्रतिनिधी) : इंग्लिश अकॅडमी यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून गेल्या 24 वर्षांत या अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर विविध प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत झाली आहेत या अकॅडमीने गुणवत्तेचा चढता आलेख सदैव कायम ठेवला आहे आणि या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी तो आलेख एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवला त्याबद्दल सदर सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे त्यांनी मनापासून कौतुक करत येत्या काळामध्ये ही इंग्लिश अकॅडमी खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्यातील इंग्रजी विषयाची गुणवत्ता देणारी त्याचबरोबर संस्कारशील विद्यार्थी घडवणारी एक अत्यंत महत्त्वाची अकॅडमी म्हणून ओळखली जाईल असा विश्वास दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
नुकताच मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आणि या निकालामध्ये ढगेज् इंग्लिश अकॅडमीच्या तब्बल चार विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 98 गुण मिळवत एक नवा इतिहास रचला एवढेच नाही तर शंभर पैकी 90 पेक्षा अधिक गुण घेणारे 100 पेक्षा अधिक विद्यार्थी अकॅडमीचे असून १०० पैकी 85 पेक्षा अधिक गुण घेणारे हे जवळजवळ दीडशे विद्यार्थी ढगेज् इंग्लिश अकॅडमीतून बाहेर पडले आहेत . ह्या सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच ढगेज् इंग्लिश अकॅडमी लातूर येथे पार पडला या सत्कार समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत देशमुख बोलत होते. लातूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार गणेश सरवदे प्राचार्य निलेश राजेमाने पत्रकार इस्माईल शेख आदर्श शिक्षक नागापुरे ढगेज् इंग्लिश अकॅडमीचे आधारस्तंभ प्रा. व्यंकटराव ढगे , प्रा. सचिदानंद ढगे,व प्रा. विवेकानंद ढगे यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेतील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सचिदानंद ढगे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संभाजी नवघरे तर आभार प्रदर्शन प्रा. मकरंद गिरी यांनी केले .
