आदित्य ठाकरे यांनी सामाजिक बांधिलकीचे धडे दिले – चंद्रकांत टेंगेटोल

0
आदित्य ठाकरे यांनी सामाजिक बांधिलकीचे धडे दिले - चंद्रकांत टेंगेटोल

उदगीर (एल. पी. उगिले) : शिवसेनेचे प्रेरणास्थान युवकांचे हृदयसम्राट युवासेना प्रमुख आ. आदित्य उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक जाणीव जपण्याचा आणि आपण या समाजाचे काही देणे लागतो, याची जाण ठेवत सामाजिक ऋण जपण्याचा संदेश दिला आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतला आहे. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उदगीर तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी दिली आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने शहरातील विविध रुग्णालयात जाऊन रुग्णाची अस्थेवाईकपणे विचारपूस करून, त्यांना धीर देऊन, फळे वाटप करून, ते लवकर दुरुस्त व्हावेत. म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी संयोजक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, उपजिल्हाप्रमुख अंकुश कोनाळे, विधानसभा प्रमुख श्रीमंत सोनाळे, विधानसभा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, महिला आघाडीच्या विधानसभा संपर्कप्रमुख अरुणाताई लेंडाने, शहर प्रमुख अनिल पंचाक्षरी, उपतालुका प्रमुख महेश फुले, बाळू वडले, विष्णुकांत चिंतलवार, प्रदीप पाटील लिंबगावकर, वीरेंद्र स्वामी, ओम ददापुरे, परविन बिरादार, सोहेल शेख, आदित्य सांडगे, सुनीता फुलारी, कल्पना जाधव, सरोजा बिरादार, वच्छला मुळे, नंदा पांढरे, रेखा कांबळे, लक्ष्मी बोडके इत्यादी प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. पुढे बोलताना चंद्रकांत टेंगेटोल यांनी सांगितले की, शिवसेना ही जनकल्याणार्थ काम करणारी समाजसेवी संघटना आहे. समाजसेवेचे माध्यम म्हणून राजकारण निवडले आहे. 80 टक्के समाजकारण आणि फक्त 20% राजकारण अशा पद्धतीचे धोरण डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिक काम करतात. समाजातील सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्या आवडत्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना, हार तुरे यासाठी खर्च न करता सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देण्यामध्ये पुढाकार घेणे ही आम्हाला शिकवण आहे. तेच जपण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. समाजसेवेतूनच पक्ष संघटन बांधणीचा आमचा प्रयत्न आहे. लोकांच्या अडीअडचणीत जो धावून जातो, जनता त्याच्यासोबत राहतेच. असा ठाम विश्वास लोकसभेतील निवडणुकीने दाखवून दिला आहे. असेही चंद्रकांत टेंगेटोल यांनी स्पष्ट केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!