काँग्रेस शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी माधव जाधव

0
काँग्रेस शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी माधव जाधव

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र प्रदेश शिक्षक सेलच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदावर उदगीर तालुक्यातील विद्यावर्धिनी हायस्कूल चे सहशिक्षक माधव संग्राम जाधव यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.माधव जाधव यांना शिक्षकी पेशातील दीर्घ अनुभव असून शिक्षकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शिक्षकांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करत असतात. शिक्षण क्षेत्राशिवाय तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक उपक्रमांत त्याचे सक्रिय योगदान आहे.माधव जाधव यांच्या पुरोगामी विचारांनी आजवर पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील,आ.दिलीपराव सोनवणे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या शिफारसीने लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिक्षक सेल जिल्हाध्यक्षपदी माधव जाधव यांची नियुक्ती पक्ष कार्यालय लातूर येथे करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गंगापूरे, प्रा. सुधीर साळुंखे, युवक प्रदेश सरचिटणीस निशांत वाघमारे, युवक प्रदेश सचिव चंद्रशेखर कत्ते, पुरुषोत्तम पाटील, ऍड. नागरगोजे, प्रा. संजय जाधव,प्रा. नरवडे, प्रशांत पाटील व इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!