एलसीबीची उत्कृष्ट कारवाई १ पिस्टल, २ जिवंत काडतुस व मॅग्झीनसह आरोपी अटक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, एका इसमांकडून ०१, पिस्टल ०२ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 16/06/2024 रोजी औसा तुळजापूर जाणाऱ्या रोडवर चिंचोली येथे पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेऊन चौकशी केली असता, इसम नामे महेश दिनकर कुलकर्णी, (वय 30 वर्ष, रा टाका ता औसा जि लातूर) याच्या ताब्यातून १ पिस्टलसह, २ जिवंत काडतुसे व मॅग्झीन हस्तगत करण्यात आले आहे. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे भादा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 128/24 कलम 3 (1) 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला आहे. पुढील तपास भादा पोलिस स्टेशन कडून करण्यात येत आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून 1 पिस्टल, 2 राउंड व मॅग्झीन बाळगणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे.सदर आरोपी महेश दिनकर कुलकर्णी हा सध्या पुणे येथे वास्तव्यास असून पो.स्टे.सिंहगड रोड पुणे गु.र.नं. 05/2015 कलम 302 भादवि सह 4/25 शस्त्र अधिनियम मधील आरोपी असून त्यामध्ये त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याने त्याच्या मूळ गावी आला होता. सदरची कारवाई सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनात संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.
