गजानन सताळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
गजानन सताळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : गजानन महाराज सताळकर यांच्या वाढदिवस निमित्त विविध राजकीय पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून व शुभेच्छा दिल्या. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाच्या पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांनी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली. त्यासोबतच शाश्वत विकासाची संकल्पना रुजवण्यासाठी शहरात वृक्षारोपण करण्यात आले. लातूरचे खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी सताळकर यांचा सत्कार करीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
उदगीर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती गजानन महाराज सताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन सताळकर मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी गजानन महाराज सताळकर, नामदेव भोसले, प्रेम तोगरे, हबीबखान पठाण, अण्णासाहेब बनशेळकीकर,संतोष जाधव, आकाश कस्तुरे, कपिल शिंदे, आश्विन मादळे, राम सूर्यवंशी, विकास बनशेळकीकर यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
