शिक्षकांच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद म्हणजे निरोप समारंभ – आमदार विक्रम काळे
शिक्षकांच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद म्हणजे निरोप समारंभ - आमदार विक्रम काळे
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षकाने आयुष्यभर प्रामाणिकपणे केलेले विद्यादानाचे कार्य याच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद म्हणजे शिक्षकांचा निरोप समारंभ असतो. असे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी अहमदपूर येथे यशवंत विद्यालयातील एच एस सी वोकेशनल विभागाचे प्राध्यापक अनिल चवळे यांच्या निरोप समारंभ बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब जाधव , डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे ,संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर,उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, सहसचिव डॉ .सौ सुनीता ताई चवळे, सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ डॉ.संतोष तोडकर, शिवानंद हिंगणे हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक हा समाजाचा कणा आहे. समाजात सकारात्मक भाव निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करत असतो असे प्रतिपादन केले.
माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी सर्वच शिक्षकांचा कार्याचा गौरव करताना आजही शिक्षक ग्रामीण भागात वाडी तांड्यावर शिक्षणासोबतच सामाजिक भाव व शैक्षणिक मूल्य जोपासण्याचे कार्य करत आहेत असे मत व्यक्त केले. त्यांनी यशवंत परिवाराच्या शैक्षणिक कार्याचा व डीबी लोहारे गुरुजी यांच्या कार्याचाही गौरव केला.
ज्येष्ठ पत्रकार तथा रोटीचे माजी प्रांतपाल डॉक्टर ओमप्रकाश मोतीपवळे यांनी शिक्षकांचे सामाजिक मूल्य खूप मोठे आहे शिक्षक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असून येणाऱ्या पिढ्यावर भारतीय संस्कार हे शिक्षकच करू शकतात. यामुळे या बदलत्या शैक्षणिक युगामध्ये शिक्षक व शैक्षणिक संस्थाचे महत्व कमी होत नाही असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सेवापूर्ती बद्दल प्राध्यापक अनिल चवळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अनिल चवळे यांनी यशवंत परिवार व अहमदपूर शहरवासी यांच्या बद्दल आपले ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांनी प्रा अनिल चवळे यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी निवृत्तीनंतरही समाज व सामाजिक कार्यात अग्रेसर राहावे असे प्रतिपादन केले.
यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन शिंदे उपमुख्यद्यापक घोटे पर्यवेक्षक अशोक पेद्येवाड पर्यवेक्षक राम तात्तापुरे हे यावेळी मंचावर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्तावित उपप्राचार्य सय्यद एम यु यांनी केले मनोगत महेंद्र खंडागळे यांनी तर सूत्रसंचालन कपिल बिराजदार व आभार प्रा रवी इरफळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शहरातील नागरी पत्रकार बांधव मान्यवर किती यशवंत परिवारातील सर्व शिक्षक बांधव व केतकर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
