महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींनीच घेतली विद्यापीठीय परीक्षेत उत्तुंग भरारी

0
महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींनीच घेतली विद्यापीठीय परीक्षेत उत्तुंग भरारी

महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलींनीच घेतली विद्यापीठीय परीक्षेत उत्तुंग भरारी

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या विशेषत:विद्यार्थीनिनी यशाची परंपरा कायम ठेवत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘फुले पॅटर्न’ ची पताका पुन्हा फडकवत पालकांनी व विद्यार्थ्यांनी बी.ए. ला. प्रवेश घेताना केलेल्या फुले महाविद्यालयाची निवड ही सार्थ ठरली, असल्याच्या पालकांच्या प्रतिक्रिया

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहिर झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२४ च्या परीक्षेत बी.ए. विद्या शाखेत विशेष गुणवत्ता प्राप्त करीत उत्तुंग भरारी घेतल्याने आपण आपल्या पाल्यासाठी महात्मा फुले महाविद्यालयाची योग्य निवड केल्याच्या प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटत आहेत.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली २००९ पासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात गुणवत्ते सह विविध क्षेत्रात ‘फुले पॅटर्न’ निर्माण केला असून उच्च शिक्षणात ज्ञान पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूरला महात्मा फुले महाविद्यालयाने गतवैभव प्राप्त करून दिले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२४परीक्षेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु . शेख नगमा खलील हिने ८८ % टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पाठविला तर, कु. पठाण नूरजहॉ शौकत या विद्यार्थिनींनी ८७.८०% गुण घेऊन सर्व द्वितीय तर कु .जाधव शालू भीमा या विद्यार्थिनीने ८६.५५% गुण घेऊन सर्व तृतीय येण्याचा मान पाठविला आहे. बी.ए.तृतीय वर्षाचा एकूण निकाल ८४.४४% लागला असून ३१ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ७विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बी.ए.द्वितीय वर्षातून कु .गिरी अश्विनी अच्युत ही विद्यार्थी ७६. ६२ %सर्वप्रथम तर कु. कुरिल नेहा संजय ७४. ५७% सर्व द्वितीय व कु. दराडे प्रतीक्षा शिवाजी ही विद्यार्थी ७४. ४३% घेऊन सर्व तृतीया आली आहे. बी.ए. द्वितीय वर्षाचा एकूण निकाल ९७.२९% टक्के लागला असून पाच विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बी.ए. प्रथम वर्षतून कु . पटवारी दुर्गा लालचंद ८५.२४ % सर्वप्रथम, कु. भदाडे ऐश्वर्या अंतराम ८०.५० % सर्व द्वितीय तर गुळवे दिव्या माधव ७७.५४ % घेऊन सर्व तृतीय आली असून, बी.ए. प्रथम वर्षाचा एकूण निकाल ८८.६३% एवढा लागला आहे तर १७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणी व १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांसह इतर चांगली टक्केवारी घेणा-या पालकांनी आपण आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी महात्मा फुले महाविद्यालय हे योग्य असलेल्या महाविद्यालयाची निवड केली त्याचे समाधान असल्याच्या आग्रही प्रतिक्रिया महाविद्यालयाकडे दिल्या आहेत.
सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पी.टी. शिंदे यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयातील महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह श्रेयाचे खरे मानकरी असलेल्या सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!