महात्मा बसवेश्वर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे एमएचटी-सीईटी परीक्षा २०२४ मध्ये नेत्रदीपक यश यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार संपन्न
महात्मा बसवेश्वर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे एमएचटी-सीईटी परीक्षा २०२४ मध्ये नेत्रदीपक यश यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार संपन्न
लातूर (प्रतिनिधी ) : श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने यावर्षी एमएचटी-सीईटी परीक्षा २०२४ मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी शाल, पुष्पगूच्छ आणि पेढे देऊन केला. यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. सिद्राम डोंगरगे, नीट/सीईटी/जेईईचे समन्वयिका प्रा. वनिता पाटील, बोर्ड समन्वयक डॉ. गुणवंत बिरादार यांची उपस्थिती होती.
या परीक्षेत महाविद्यालयातील पीसीबी ग्रुप मधून शेख सोहेल 99.19 पर्सेंटाइल, जोशी दिशा 98.50 पर्सेंटाइल, नोगजा विजय 98.08 पर्सेंटाइल, क्षीरसागर वृषाली 97.65 पर्सेंटाइल, ठनके परस, 94.99 पर्सेंटाइल, टोंपे सम्यक 94.65 पर्सेंटाइल स्वामी शांभवी ९२.१५ पर्सेंटाइल, शेख अल्फीया 91.61 पर्सेंटाइल, रांजीरे अमित 91.05 पर्सेंटाइल यांनी उज्ज्वल यश संपादन केले. तर 75 पर्सेंटाइलच्यावर गुण घेऊन महाविद्यालयातून एकूण 24 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
महाविद्यालयातून पीसीएम ग्रुपमधून तोलनूरे सत्यम संतोष 94.82 पर्सेंटाइल, बजाज अंकुर 89.92 पर्सेंटाइल, लोंढे प्रतीक 89.59 पर्सेंटाइल, सोळुंके ऋतुजा 89.26 पर्सेंटाइल, राठोड अविनाश 87.89 पर्सेंटाइल, पतंगे अमित 87.55 पर्सेंटाइल, आदिती एलगटे 85.34 पर्सेंटाइल, राजगिरवाड कृष्णा 85.25 पर्सेंटाइल, शेख रेहान 83.5 पर्सेंटाइल, कुलकर्णी प्रणव 81.81 पर्सेंटाइल गुण घेऊन यशस्वी झालेले आहेत. तसेच आमच्या महाविद्यालयातून 75 पर्सेंटाइलच्यावर पीसीएम ग्रुपमधून एकूण १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व नेत्रदीपक यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील (तपसेचिंचोलीकर), संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडीगावे, संचालक राजेश्वर बुके, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालिका ललिता पांढरे, संचालक राजेश्वर पाटील, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक प्रभूप्पा पटणे, संचालक गुरुलिंग धाराशिवे आणि संचालक महेश हालगे यांनी अभिनंदन करून महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी केले. विज्ञान शाखा समन्वयक डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वनिता पाटील यांनी केले. तर आभार प्रा. शिवशरण हावळे यांनी मानले.
या सत्कार समारंभाला प्रा.एन.ए.गोरे, प्रा.पाटील एस.एम., प्रा.व्ही.जी. स्वामी, प्रा.एम.डी. बोळेगावे, प्रा.बजाज दीपक, प्रा.एस.बी.माळी, प्रा.एस.जी.माळी, प्रा.जणगावे वाय.डी. यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे, यशपाल ढोरमारे, राजाभाऊ बोडके आणि अशोक शिंदे यांनी परिश्रम घेतले.
