नणंद जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मूल एक झाड उपक्रम साजरा
नणंद जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मूल एक झाड उपक्रम साजरा
नणंद (प्रतिनिधी) : नणंद जिल्हा परिषद शाळेमध्ये एक मूल एक झाड उपक्रम साजरा करण्यात आला सध्या पालकांचा इंग्लिश माध्यमाच्या शाळांकडे असलेली ओढ पाहता नणंद येथील जिल्हा परिषद शाळेने एक मूल एक झाड उपक्रम साजरा करत गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी जास्तीत जास्त प्रवेशित कशा पद्धतीने होतील यासाठी गावात प्रभात फेरी करत गावातील विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यासाठी पालकांच्या भेटी घेत गावात प्रभात फेरी केली व लातूर जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता शेलार साहेब , निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अकेले साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले यावेळी नणंद जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक पवार सर, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष कुमार लादे ,सरपंच हरिदास बोळे, ग्रामसेवक धनंजय भोसले, शिवाजी इंडे, चांदपाशा शेख, गणेश लादे, बाबुराव पाटील, व शाळेतील शिक्षक यावेळी उपस्थित होते . शाळेत आलेल्या पालकांचे व पाहुण्यांचे आभार शाळेतील शिक्षक वाघमारे व्ही. एच. यांनी मानले.
