संत गोरोबा सोसायटीच्या विकास सतीश कांबळे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांची बैठक
संत गोरोबा सोसायटीच्या विकास सतीश कांबळे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांची बैठक
लातूर (प्रतिनिधी) : ०७ जुलै 2024 रोजी मतदान होऊ घातलेल्या संत गोरोबा सोसायटीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने विकास सतीश कांबळे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांची बैठक विवेकानंद चौक येथील काॅगेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक तीन च्या कार्यालयावर आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत बिनविरोध संचालक सूर्यभान पुरी यांचा सत्कार सर्वांच्या वतीने करण्यात आला.त्याचबरोबर संत गोरोबा सोसायटी निवडणुकीच्या प्रचार प्रमुख सोसायटीचे कोषाध्यक्ष श्री. प्रकाशभाऊ पाडोळे यांची निवड करण्यात आली.संत गोरोबा सोसायटीच्या विकासाची केलेल्या कामाची माहिती देऊन कामावर मतदान मागावे अशी सुचेना यावेळी सर्वांच्या वतीने करण्यात आल्या.या बैठकीला संत गोरोबा सोसायटीचे माजी चेअरमन विकास कांबळे,ॲड.राजेद़् लोंढे,अजय खंडागळे,सोसायटीचे सचिव देविदास गायकवाड,अंगद सुर्यवंशी कोषाध्यक्ष प्रकाश पाडोळे, संदिप गायकवाड, काशिनाथ वाघमारे,लिंबराज मगर, राजू गायकवाड, प्रकाश सुर्यवंशी, भगवान कांबळे,अर्जुन झेंडे, सचिन शिंदे, धनंजय गायकवाड, अश्विनी गायकवाड, विशाल कांबळे,हरी पवार, पवन कांबळे आदी उपस्थित होते.
