माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नांना यश
माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नांना यश
लातूर (लातूर) : माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामाबरोबर महापुरुषांचा प्रेरणादायी आदर्श जनतेसमोर ठेवत महापुरुषांच्या जयंत्या ,सण उत्सव साजरे करून आपल्या कार्यकाळात जनमाणसांमध्ये स्थान मिळवले. 14 एप्रिल 2022 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य देखावा स्वरूपात पुतळा उभारण्यात आला. ही कलाकृती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आंबेडकरी जनतेतून आंदोलन उपोषणे करण्यात आले. उपोषण व आंदोलनाची माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी दखल घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फूट पुतळा उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले. पहिल्या टप्प्यात या कामासाठी माजी खासदार शृंगारे यांनी निधीही मंजूर करून घेतला आता या कामासाठी महानगरपालिकेच्या वतीने डिझायनर आणि सल्लागार अभियंता नेमण्याबाबत ई निविदा मागवल्या आहेत. माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या 75 फूट पुतळ्याच्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल लातूर लोकसभा मतदारसंघातील आंबेडकरी जनतेच्या वतीने व मतदार संघातील सर्व समाज बांधवांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
