खंडाळी मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा ; माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे निवेदन
खंडाळी मंडळातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा ; माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील खंडाळी मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी अहमदपुर तहसीलदार यांची पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात तहसील कार्यालयात भेट घेऊन निवेदन देण्यात आले
खरीप हंगाम सन 2023-24 साली खंडाळी मंडळातील शेतकर्यांनी पीक विमा नोंदणी केली होती व ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.विमा कंपनी च्या सुचनेनुसार 72 तासाच्या आत शेतकरी बांधवांनी पिक नुकसानीची नोंद Crop Insurance App दिल्या आहेत व त्या विमा कंपनीने त्या स्वीकारल्या सुद्धा आहेत,त्या विभागाचे कर्मचारी यांनी पंचनामे केले आहेत पण त्यातील शेतकर्यांना पीक विम्याची संरक्षीत रक्कम मिळाली असुन व अनेक शेतकरी अजूनही पीक विम्याच्या संरक्षीत रक्कमेपासून वंचित आहेत. ज्या विमा लाभार्थी शेतकर्यांना अद्यापही पीक विम्याची संरक्षीत रक्कम मिळाली नाही अशा शेतकर्यांना तात्काळ पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली तहसिलदार यांनी सदरील मागणीची दखल घेऊन तात्काळ यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस मा.निळकंठराव मिरकले,माजी सभापती आर.डी दादा शेळके,माजी उपसभापती मा.राजीव खंदाडे यांच्यासह खंडाळी येथिल शेतकरी मा.व्यंकटराव पाटील,मा.कालीदास कदम,मा.गोविंदराव पौळ,मा.अशोकराव देमगुंडे,मा.नारायणराव जाधव तसेच रमाकांत शिंदे आदी उपस्थित होते.
