अहमदपूर येथे शनिवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिर

0
अहमदपूर येथे शनिवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिर

अहमदपूर येथे शनिवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिर

अहमदपूर (गोविंद काळे) : धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर यांच्या वतीने सरस्वती प्राथमिक शाळा,काळेगाव रोड, अहमदपूर येथे शनिवार,दिनांक:-२२ जून २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० ते दुपारी ०४.०० या दरम्यान मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नि:शुल्क मोतीबिंदू व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब जाधव; अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय-कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील; अहमदपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जहागीरदार; बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर चे सदस्य साहेबराव जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये वातविकार,आम्लपित्त,मधुमेह,त्वचाविकार,दंतरोग,श्‍वसनविकार,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी समस्या(श्वेतप्रदर,रक्तप्रदर),इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिलांची मोफत(नि:शुल्क)कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नि:शुल्क(मोफत)केली जाईल आणि तसेच प्रसुती(बाळंतपण) व गर्भाशयासंबंधीत विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडिक्स,हर्निया,हायड्रोसिल,मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया अल्प(५०% सवलत)दरात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे केली जाणार आहे.

शिबिरामध्ये लॉयन्स नेत्र रुग्णालय,उदगीर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी करून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींवर अल्प दरात औषधोपचार व शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहेत.

शिबिरामध्ये आयुर्वेद,अलोपॅथी,डेन्टल,होमिओपॅथी व युनानी या विविध चिकित्सा पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टर्स वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत.

तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज,उदगीर चे प्राचार्य तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय पाटील,डॉ.मंगेश मुंढे,डॉ.उषा काळे;डॉ.रविकांत पाटील,डॉ.पुष्पा गवळे,डॉ.अमोल पटणे,डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.योगेश सुरनर,डॉ.प्राजक्ता जगताप,डॉ.गुरुराज वरनाळे,डॉ.दीपिका भद्रे,डॉ.नम्रता कोरे,डॉ.शिवकुमार होटुळकर,डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.शिवकुमार मरतुळे,डॉ.सुप्रिया पाटील आणि तसेच शिबीर संयोजन समितीचे अन्य सर्व सदस्य तथा धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर चे शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!