प्राणायाम ध्यान योगाने माणसाचा आत्मविश्वास आणि आयुर्मान वाढते तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांचे प्रतिपादन
प्राणायाम ध्यान योगाने माणसाचा आत्मविश्वास आणि आयुर्मान वाढते तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : आज समाजातील प्रत्येक घटकातील माणूस आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्याचे मानवी शरीराकडे विशेष लक्ष नाही. त्यामुळे तो विविध व्याधीने त्रस्त आहे. म्हणून समाजातील या व्याधी नष्ट करायच्या असतील तर राम प्रहारी अत्यंत प्रामाणिकपणे घराघरात प्राणायाम ध्यान योग केल्याने आत्मविश्वास व आयुर्मान वाढते असे अग्रही प्रतिपादन तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांनी केले. ते दि 21 रोजी डॉ.एस एस एम प्रतिष्ठान च्या शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर, गटविकास अधिकारी अमोल कुमार
आंधेलवाड, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, प्राचार्य दिलीप मुगळे, प्राचार्य गजानन शिंदे, सेवानिवृत्त प्रा. योगशिक्षक अनिल चवळे, योगशिक्षक गौरव चवंडा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी योग गुरु प्रा. अनिल चवळे, योग शिक्षक गौरव चवंडा यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून योगा विषयी विस्तारित स्वरूपात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. मुजमील सय्यद, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण प्रेमी नागरिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार प्राचार्य दिलीप मुगळे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
