संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा
संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक 21 जून 2024 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मानवी जीवनामध्ये योगाला अनन्यसाधारण महत्त्व असून विद्यार्थ्यांनीही मौन, प्राणायाम व विविध आसने करून आपल्या मनाची एकाग्रता वाढवावी. असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका छाया दिदी यांनी केले.
त्या दिनांक 21 रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून महिला पतंजली योग समितीच्या प्रेमा वतनी, जिल्हा प्रभारी कलावती भातांब्रे, लिनेस क्लब च्या अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय योगशिक्षिका पुष्पा ठाकूर, रंजना आंधळे, लिंगेश्वर भजनी मंडळाच्या अध्यक्षा आशा आवाळे, विठाई फुलारी,छाया विळेगावे,शुभांगी पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मीनाक्षी तोवर यांची उपस्थिती होती. यावेळी योग शिक्षिका प्रेमा वतनी , कलावती भातांब्रे,पुष्पा ठाकूर,योग गुरु नंदकुमार मद्देवाड, सतीश साबणे यांनी योगासने, प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून योगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमासाठी लिनेस क्लब सदस्या, पतंजली महिला योग समितीच्या सदस्या यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित सर्व योग शिक्षकांच्या हस्ते विद्यालयाच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने सर्व योगा शिक्षकांचा शाल व वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार मीनाक्षी तोवर यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
