अयोध्या नगरीत वडाचे झाड लावून केली वटसावित्री पौर्णिमा साजरी

0
अयोध्या नगरीत वडाचे झाड लावून केली वटसावित्री पौर्णिमा साजरी

अयोध्या नगरीत वडाचे झाड लावून केली वटसावित्री पौर्णिमा साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील अयोध्या नगरीतील सर्व महिलांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्यामुळे वडाच्या वृक्षाची लागवड करून वट सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील अल्पावधीतच आदर्श कॉलणी म्हणून नावलौकिक मिळविलेल्या आयोध्या नगरीत सर्व उच्चशिक्षित महिलांनी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी केलेल्या अवाहनानुसार वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून वडाच्या झाडाच्या रोपाचे रोपण करून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली.या वेळी
ॲड. सौ. अमृता पांडुरग चिलगर, सौ. मेघा सचिन लांडगे, सौ. ज्योती बालाजी बयास, सौ. सारिका दिपक श्रीरामे, सौ. अनिता विशाल उर्फ साहेबराव लांडगे पाटील, सौ. अश्विनी आकाश आत्राम, सौ. शामाताई संग्राम सलगर, सौ. लक्ष्मीबाई संतोष जुबरे , सौ. वनिता राम चव्हाण, सौ. ज्योती मच्छिन्द्र चव्हाण आदीं महिलांच्या हस्ते वडाचे वृक्षारोपण करून वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्षा सौ. अश्विनीताई कासनाळे, सौ. रजनीताई हाडोळीकर, सौ. मनीषा फुलारी , लक्ष्मीकांत कासनाळे, राम चव्हाण, प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर, विशाल उर्फ साहेबराव लांडगे पाटील, रामेश्वर पाटील हाडोळीकर , अमोल फुलारी , अमर ख्याडे , संतोष जुबरे , सचिन देशपांडे , प्रा. डॉ. वसंत मोटेगावकर आदींनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!