अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी प्रा. लक्ष्मण हाके यांची उपोषस्थळी भेट घेऊन दिला पाठींबा

0
अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी प्रा. लक्ष्मण हाके यांची उपोषस्थळी भेट घेऊन दिला पाठींबा

अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी प्रा. लक्ष्मण हाके यांची उपोषस्थळी भेट घेऊन दिला पाठींबा

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील ओबीसींच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या वडगोद्री ता. आबंड जि. जालना येथील आमरण उपोषणाला भेट देऊन अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी जाहीर पाठींबा दिला. सदरील पाठीब्यांचे लेखी पत्र एका शिष्टमंडळाद्वारे गोविंद गिरी यांनी दिले आहे.
वडगोद्री ता. आंबड जी. जालना येथे ओबीसी आरक्षण संदर्भात गेल्या एक आठवड्या पासून आमरण उपोषण सुरू असल्याने लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांची अहमदपूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी शेकडो गाड्या च्या ताफ्यासह जाऊन प्रा. लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन सदरील आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.
सदरील शिष्टमंडळात माजी सभापती अशोक काका केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यबंक आबा गुट्टे, ज्ञानोबा बडगिरे, गोविंद गिरी,बालाजी सारोळे, महेश बिलापट्टे,बालाजी गुट्टे, माणिक नरवटे,रामानंद मुंडे,रमेश कांबळे, दत्ता खंदाडे, संग्राम नरवटे, रामचंद्र चिगळे, दिलीप पडीले, राजू नरवटे, रवी सिरसाठ, हरीभाऊ सोटगिर, गजेंद्र वलसे,कुलदीप हाके, चंद्रप्रकाश हांगे, संदीप गुरमे, हणमंत बडगिरे, नागेश केंद्रे,सतिष केंद्रे,अनंत गुंडरे,बबलू भुसारे, बालाजी वलसे,सुरेश आला पुरे, धनंजय राचमाले,बाबु आलापुरे यांच्या सह अहमदपूर तालुक्यातील असंख्य ओबीसी समाज बांधव सदरील शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!