विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच कौशल्य ही आत्मसात करणे गरजेचे – आ. बाबासाहेब पाटील

0
विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच कौशल्य ही आत्मसात करणे गरजेचे - आ. बाबासाहेब पाटील

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच कौशल्य ही आत्मसात करणे गरजेचे - आ. बाबासाहेब पाटील

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर अहमदपूर

अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी या बदलत्या काळामध्ये तांत्रिक शिक्षण घेणे गरजेचे आहे व त्याबरोबरच यामधील कौशल्य ही आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग मुंबई व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहमदपूर द्वारा आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य शिवाजीराव कवलेकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर ,अनिल चवळे , प्रा गोविंद काळे ,चाकूर आयटीआयचे प्राचार्य संजय माळकुंजे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की तंत्र कौशल्याने रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती होते व त्यामुळेच परिपूर्ण ज्ञान व त्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण घेणे ही गरजेचे आहे असे ते म्हणाले ‌
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य शिवाजीराव कवलेकर यांनी करताना विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत आयटीआय व तत्सम तंत्रशिक्षणामुळे समाजात रोजगार निर्मिती होऊन व्यवसायभिमुख विद्यार्थी तयार होतो . विद्यार्थ्यांनी आयटीआय सारख्या संस्थेत प्रवेश घेऊन त्याच्या पुढील तांत्रिक अभ्यास सुद्धा पूर्ण केला पाहिजे यामुळे त्यांना रोजगार मिळू शकतो असे म्हणाले.
प्रमुख मार्गदर्शक साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसुरकर यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत जीवनात यश मिळवले पाहिजे व याचा पाया व्यवसाय शिक्षण आहे त्यामुळे आपण व राष्ट्र दोन्हीही मजबूत होतो असे सांगितले. विद्यार्थ्याने मोबाईल पासून दूर राहुन वास्तव जेवणात जगावे असे हे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रातील पाहुणे डॉक्टर गोविंद काळे यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर बोलताना न्यूनगंड न बाळगता आत्मविशेषाने शैक्षणिक वाटचाल करत आपली पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा आपले भविष्य काय आहे याचा विचार करत विद्यार्थ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.
प्रा अनिल चवळे यांनी आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी खूप संधी आहेत फक्त आपल्या राज्यात देशातच नव्हे तर देशात सुद्धा आयटीआय केलेले विद्यार्थी परदेशात सुद्धा कार्यरत असून येणारा काळ हा स्किल डेव्हलपमेंट व स्किल मॅनपॉवर यांचाच आहे असे सांगितले.

यावेळी एसबीआय बँकेच्या मांजरीकर मॅडम जिल्हा उद्योग केंद्राचे कांबळे साहेब यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम सुरवसे यांनी केले तर आभार काकणाटे सर यांनी मांडले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयटीआयचे काकनाटे सर, सुरवसे सर ,अनवले सर, बोरोळे सर, पांडव सर, तरडे सर ,पठाण सर ,लवटे सर, मस्के मॅडम यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास अहमदपूर आयटीआय चे सर्व विद्यार्थी शहरातील तंत्र शिक्षण ,व्यवसाय अभ्यासक्रमाचे व पॅरामेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!