कौशल्य ही नव्या जगाची गुरुकिल्ली – आ. बाबासाहेब पाटील
कौशल्य ही नव्या जगाची गुरुकिल्ली - आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : कौशल्य ही नव्या जगाची गुरुकिल्ली आहे, शैक्षणिक कारकिर्दीसोबतच कौशल्याचा विकास होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले. अहमदपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर व समुपदेशन मेळाव्याचे उदघाटन आ. पाटील यांच्या हस्ते झाले . अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजी कवळेकर होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. अनिल चवळे, प्राचार्य सतीश माळकूंजे, प्रा. टी. जी. सुरवसे, प्रा काकनाटे, जिल्हा उद्योग केंद्राचे कांबळे उपस्थित होते . प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
“शिस्त, प्रामाणिकपणा, स्वच्छता या बाबी जिवनाला आकार देणाऱ्या असून बदलत्या जगातील प्रवाह समजून घेण्याची गरज आ . पाटील यांनी पुढे बोलताना व्यक्त केली .” व्यक्तीमत्व विकास ही विकत घेण्याची गोष्ट नसून त्यासाठी अंतःप्रेरणा हवी” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी केले . ज्ञान आणि ज्ञानाचे उपयोजन यांची सांगड घालण्याची गरज प्रा. डॉ. काळे यांनी व्यक्त केली. श्रीमती टी. जी मस्के यांनी स्वागतगीत सादर केले. प्रा. अनिल चवळे, श्रीमती मांजरमकर, श्री. कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले . प्राचार्य कवळेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. टी. जी सुरवसे यांनी आभार मानले.
