धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत सर्व रोग निदान व औषध उपचार शिबिराचे आयोजन
धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मोफत सर्व रोग निदान व औषध उपचार शिबिराचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील सरस्वती प्राथमिक शाळेत शनिवारी ( ता. 22 ) घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार, रक्तशर्करा तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीने आयोजन केलेल्या या शिबिरात माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या मुजीब पटेल जागीरदार अध्यक्षस्थानी तर शिवानंद हेंगणे, अजहर बागवान, प्राचार्य डाॅ.दत्ता पाटील, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, माजी नगरसेविका अनुराधा नळेगावकर, मोहसीन बायजीत, शाहू कांबळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या शिबिरात वात, श्वास, पोट, त्वचा, दंत, अन्य आजारांची तज्ञ डॉक्टरांनी रुग्ण तपासणी केली तर लायन्स नेत्र रुग्णालय उदगीरच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू आजाराचे निदान करण्यात आले. तज्ञांच्या वतीने करण्यात आलेल्या या तपासणी शिबिरात 1हजार 629 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त शर्करा असलेले 223 तर डोळ्याच्या मोतीबिंदूचे 58 रुग्ण निघाले.या शिबीरात लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीरात डॉ.रविकांत पाटील, डॉ.पुष्पा गवळे, डॉ.अमोल पटणे, डॉ.अय्युब पठाण, डॉ.सुप्रिया पाटील, डॉ.योगेश सुरनर, डॉ.प्राजक्ता जगताप, डॉ.दीपिका भद्रे, डॉ.नम्रता कोरे, डॉ.शिवकुमार होटुळकर, डॉ.शिवकांता चेटलुरे, डॉ.शिवकुमार मरतुळे यांनी रुग्ण तपासणी केली.
