ट्रॅक्टर चोरणाऱ्याला अटक, 7,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
ट्रॅक्टर चोरणाऱ्याला अटक, 7,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
लातूर (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅक्टर चोरणाऱ्या आरोपींस अटक केली असून त्याच्या ताब्यातून ट्रॅक्टर हस्तगत केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस ठाणे, किल्लारी हद्दी मधून ट्रॅक्टर चोरी झाल्याची तक्रार वरून पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 241/2024 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे व डॉ. श्री अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक लातूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे, दापेगाव तालुका औसा जिल्हा लातूर येथे राहणारा सचिन श्रीहरी कावळे,वय 31 वर्ष सोबत असलेला. विधी संघर्ष बालक यांना बाभळगाव चौक लातूर जाणारे सर्विस रोड वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर सह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने इतर 1 साथीदाराचे सहायाने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले. गुन्ह्यात चोरलेला ट्रॅक्टर किंमत 7,50,000/- रुपये हा पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केले आहे. पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.सदरची कामगिरी मध्ये पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार श्री. माधव बिलापट्टे, विनोद चीलमे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे , राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, चालक नकुल पाटील यांचा सहभाग होता.
