विद्यार्थ्यांनी जीवनाचे ध्येय ठरवावे – ना. बनसोडे

0
विद्यार्थ्यांनी जीवनाचे ध्येय ठरवावे - ना. बनसोडे

विद्यार्थ्यांनी जीवनाचे ध्येय ठरवावे - ना. बनसोडे

अल-अमीन विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा पाया होत असताना आपले ध्येय निश्चित ध्येय निश्चित करतानाच जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास जीवनात यशस्वी झालेल्या महापुरुषांच्या चरित्राचे वाचन त्यातून निश्चित आपल्याला प्रेरणा मिळत आपल्यासमोर आदर्श ठेवून आपल्या ध्येय निश्चितीसाठी प्रयत्न प्रयत्न केल्यानंतर यश हमखास मिळत कष्ट घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवली यशाचा मार्ग कठीण आणि खडतर असला तरी विद्यार्थी तसेच घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू आपले ध्येय गाठता असे विचार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त ते येथील अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात शेख आमेना मोहियोद्दीन या विद्यार्थिनीने पवित्र कुरआन पठणाने केली. शेख अतिक़ यांनी पैगंबरांवर लिखीत कवी सुरेश भट लिखित ‘उजाड वैराण वाळवंटी’ नात पठण केली.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव शेख अकबर यांनी संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश, गुणवंत व नीतिमान विद्यार्थी निर्माण करणे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी खूप प्रगती करावी, स्वतःचे, आई-वडिलांचे, समाजाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे. असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर दहावी बारावी, वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व पुस्तकांची भेट देऊन सत्कार करण्यात आला.
ना.संजयजी बनसोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण लक्ष शिक्षणाकडेच द्यावे, शिक्षणाशिवाय मार्ग नाही. विद्यार्थ्यांनी आजच ठरवावे की मला भविष्यात काय बनायचे आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ध्येय, दृष्टिकोन व कृती या त्रिसूत्रीचा अंगीकार करावा, असे सांगितले. अल-अमीन संस्थेतील सारे विश्वस्त समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ही संस्था स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले. ही संस्था आज समाजाला गती व योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे. या संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी उदगीरचे उपजिल्हा दंडाधिकारी सुशांतजी शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर व संस्थेचे अध्यक्ष डॉ. इसाखान यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच भविष्यातील वेगवेगळ्या क्षेत्राविषयी माहिती असावी व भविष्यात आपणाला काय बनायचे आहे, हे आत्ताच ठरवावे. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल मुजीब व आभार प्रदर्शन डॉ. शेख़ असग़र यांनी मांडले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. उदगीरचे गटशिक्षणाधिकारी शेख शफीयोद्दीन, हाशमी सलीम, शेख ख़यामोद्दीन, डॉ. शेख असगर, शेख फयाज, देवर्जनकर इब्राहिम, पठाण अबरार, कुनाल बागबंदे, दिनकर बिरादार इत्यादी मंडळीही उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सयदा आजे़मा बेगम, पर्यवेक्षक गुलाम गौस ख़ान, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनपूर्वक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!