गोविंदराव भोपणीकर यांनी भागात अत्याधुनिक शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली आहे – सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

0
गोविंदराव भोपणीकर यांनी भागात अत्याधुनिक शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली आहे - सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

गोविंदराव भोपणीकर यांनी भागात अत्याधुनिक शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली आहे - सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

कै. रसिका शैक्षणीक संकुलातील इमारतीचा शानदार शुभारंभ

देवणी (एल.पी.उगीले) : काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे रुजवत असतानाच अत्यंत प्रामाणिकपणे ग्रामीण भागात कष्टाने आणि जिद्दीने गोविंदराव गोपनीकर यांनी शिक्षण संस्था काढून देवणी सारख्या भागातून अत्याधुनिक सुविधांसह तंत्रज्ञान, विज्ञान आणि कला या सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना भौतिक सुविधा ही उपलब्ध करून दिले आहेत. हे निश्चित कौतुकास्पद आहे असे उद्गार सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले. पुढे ते असे म्हणाले की,शिक्षणातून मानवी जीवन सुखकर करण्याचे काम शिक्षण संस्थांनी करण्याची आज खरी गरज आहे. शिक्षणापासून राजकारण दूर ठेवून जे भविष्याकडे वाटचाल करतात, त्यांची प्रगती होते. अशी प्रगती रसिका शिक्षण संस्थेने केली आहे. असे प्रतिपादन सहकार महर्षी राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी केले. ते देवणी येथील जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.

गोविंदराव भोपणीकर यांनी भागात अत्याधुनिक शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली आहे - सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की, गोविंदराव भोपणीकर हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. सामाजिक व शैक्षणिक काम करून घेण्याची जिद्द व चिकाटी त्यांच्या ठाई आहे. म्हणून अल्पकाळामध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली आहे.या रसिका शैक्षणीक संकुलात २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. असे सांगुन ग्रामीण भागांतील कोणतेही काम करून घेण्याची ‘करेक्ट सिस्टीम’ भोपनीकर त्यांच्याकडे अवगत आहे. म्हणून दर्जेदार शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध केली आहे. त्याबद्दल भोपनिकर यांचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबकजी भिसे, मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जागृती कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव अभय साळुंके, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गोविंदराव भोपणीकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ऍड. प्रमोद जाधव, देवणी तालुका अध्यक्ष अजित बेळकोणे, देवणीच्या नगराध्यक्ष डॉ. कीर्ती घोरपडे, उपाध्यक्ष अमित मानकरी,सौ कुशावर्ता बेळे, भगवानराव पाटील, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राहुल बालूरे, वैजनाथ लुल्ले, विजयकुमार पाटील, महेश देशमुख, सचिन दाताळ, जावेद भाई तांबोळी, रामराव भोपणीकर, मधुकरराव लांडगे, मालबा घोनसे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव गजानन भोपणीकर यांनी केले. 2008-09 पासून सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेची विकासात्मक वाटचाल त्यांनी यावेळी सादर केली. ज्या पद्धतीने जागृती साखर कारखान्यामुळे वलांडी परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे, अगदी त्याच पद्धतीने रसिका शिक्षण संकुलामुळे देवणी परिसराचा कायापालट झाला आहे. तसेच या शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी दिलीपरावजी देशमुख यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच हे सर्व शैक्षणिक वैभव उभे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अभय साळुंके यांनी देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्था काँग्रेसने उभी केली आहे. त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यामध्ये देखील स्व. विलासरावजी देशमुख व स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टीतून जिल्ह्याचा विकास झाला आहे. या पुढे गजानन भोपणीकर यांनी नवनव्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी त्यांना संधी निर्माण करून दिली जाईल, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. संस्था काढणे सोपे आहे, पण चालवणे खूप अवघड आहे. पण त्यावर मात करून या संस्थेने केलेली वाटचाल अत्यंत उल्लेखनीय आहे. असे प्रतिपादन अशोकराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी कुलगुरु डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, या संस्थेचा अभिमान वाटावा अशी उल्लेखनीय वाटचाल या संस्थेने केली आहे. याच संस्थेची विद्यार्थिनी विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांक पटकावते, याचाही मला विशेष अभिमान वाटतो. तसेच ‘स्किल ओरिएंटेड’ शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या संस्थेने ज्ञानाबरोबरच संस्काराचे धडे देण्याचे काम करावे. या संस्थेच्या विकासासाठी मी तत्परतेने मदत करीन.असे आश्वासन यावेळी कुलगुरूंनी दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!