उदगीर शहरामध्ये तरुणांचा मनसे पक्ष प्रवेश

0
उदगीर शहरामध्ये तरुणांचा मनसे पक्ष प्रवेश

उदगीर शहरामध्ये तरुणांचा मनसे पक्ष प्रवेश

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विविध राजकीय पक्षाकडून, नेत्याकडून तरुणाईचा भ्रमनिराश होताना दिसत आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाल्याचे दिसून येत आहे.त्या मुळे सर्वसामान्यातून राजकीय क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या तरुण वर्गाला आश्वासक नेतृत्व फक्त राज ठाकरे यांच्या रूपाने दिसत असल्याने सध्या तरुणांचा ओढा मनसेकडे येताना दिसत आहे. उदगीर शहर मनसेमध्ये मोठ्या संख्येने तरुण पक्षात दाखल होत आहेत. जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते केदार पुराणिक यांच्या नेतृत्वात आदित्य कोनाडे,शरद पुल्ले, आदित्य पाटील, भिमाशंकर कोनाडे,विजय माने, महिंद्र खटके, शिवानंद मोरे, अभिजीत पाटील यांच्यासह त्यांच्या युवा सहकार्यानी मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे,मनसे शहराध्यक्ष संतोष भाऊ भोपळे, तालुका सचिव सुनीलजी तोंडचिरकर , श्रीनिवास पाटील, विनोद चव्हाण , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!