जिव्हाळा ग्रुप तर्फे जागतिक आलंपिक दिन साजरा

0
जिव्हाळा ग्रुप तर्फे जागतिक आलंपिक दिन साजरा

जिव्हाळा ग्रुप तर्फे जागतिक आलंपिक दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) येथील जिव्हाळा ग्रुप तर्फे अभियंता अनुराग अनिल भिकाने व सौ. अभिरुची अनुराग भिकाने यांचा अमेरिकेतील ह्युस्टन शहरात विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी जात असल्याबद्दल तसेच जागतिक आलंपिक दिनाचे‌औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खो खो असोशियन ने खो खो परिषदेसाठी शासकीय स्वीकृत सदस्य म्हणून प्राचार्य नामदेव गोमारे यांची निवड झाल्याबद्दल शासन मान्यताप्राप्त खोखो पंच तथा पद्मावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुडसूरचे प्राचार्य नामदेव गोमारे यांचा सेवा निवृत्त व्हालीबालपटू देविदास नादरगे व शिवमूर्ती अप्पा भातांब्रे, सायकल व जलतरणपटू अभिरुची मुडपे यांचा रमाकांत बनशेळकीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे ज्ञानोबा कोटलवार, प्रा.डि.आर.पाटील, विश्वनाथ माळेवाडीकर, अरुणा ताई भिकाने, पांडुरंग बोडके, विश्वनाथ मुडपे इत्यादींच्या उपस्थितित भव्य सत्कार संपन्न झाला.कार्यक्रमाचे‌ सूत्र संचालन लक्ष्मीकांत बिडवई यांनी केले तर दशरथ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनाथ पाटील, चंद्रकांत रोडगे, चंद्रकांत पांचाळ, चंद्रकांत उप्परबावडे, शंकरराव साबणे, वैजनाथ पंचगल्ले अमृतराव देशपांडे, सोपानराव माने, शरणप्पा खेळणे इ नी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!