आई-वडिलांच्या विवाहाच्या एकसष्टीला शैक्षणिक साहित्याची तुला

0
आई-वडिलांच्या विवाहाच्या एकसष्टीला शैक्षणिक साहित्याची तुला

आई-वडिलांच्या विवाहाच्या एकसष्टीला शैक्षणिक साहित्याची तुला

आव्होपा च्या माध्यमातून गरजूंना वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : आई-वडिलांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या साहित्याची तुला करत ते ग्रामीण भागातील उपेक्षित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम उदगीर येथील व्यापारी योगेश जळकोटे यांनी राबविला आहे .
उदगीर येथील शामलाल विद्यालयातून सेवानिवृत्त झालेले शिक्षक विजयकुमार जळकोटे व सौ . सुमनबाई जळकोटे यांच्या विवाहाला साठ वर्ष पूर्ण झाली . या निमित्ताने पारंपारिक उपक्रम राबविण्या ऐवजी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संकल्प जळकोटे कुटुंबीयांच्या वतीने व्यक्त करण्यात आला . या उपक्रमांतर्गत श्री . व सौ . जळकोटे यांची शैक्षणिक साहित्यतुला करण्यात येऊन यामध्ये शैक्षणिक साहित्य वह्या ,पेन , कंपास आदींची तुला करण्यात आली . जळकोटे यांच्या विवाह वर्धापन दिनाच्या निमित्ताने या तुला अंतर्गत साहित्य तालुक्यातील व परिसरातील विविध शाळांतील गरीब विद्यार्थ्यांसाठी देण्याचा संकल्प जळकोटे यांनी राबवताना आपल्यातील सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले.

आर्य वैश्य ऑफिशिअल अँड प्रोफेशनल असोसिएशनच्या ( अव्होप) वतीने दरवर्षी अशा विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम हाती घेऊन उदगीर, जळकोट , देवणी परिसरातील शाळांमधून अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. योगेश जळकोटे यांनी हे साहित्य अव्होपा मार्फत वितरित करण्यासाठी आव्होपाच्या या प्रकल्पाचे प्रमुख व आव्होपाचे सचिव यांच्याकडे हस्तांतरित केले . त्यानुसार शाळा सुरू झाल्यानंतर आता या परिसरातील विविध शाळांमधून या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे .

अव्होपाकडून मागच्या दहा वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यातील हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना असे साहित्य वाटप करण्यात आले आहे. आव्होपाच्या सदस्या सोबतच समाजातील इतर दानशूर सदस्यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपल्या कुटुंबातील मित्रपरिवारातील वाढदिवस , स्मृतीदिन या निमित्त अशा साहित्याचं वाटप करीत संवेदनाचे दर्शन घडविले . संस्थापक अध्यक्ष प्रा . डॉ . दीपक चिद्यरवार, अध्यक्ष प्रा . संजय चन्नावार सचिव व प्रकल्प प्रमुख विजय गबाळे, कोषाध्यक्ष राकेश पांपट्टीवार, उपाध्यक्ष संजय पत्तेवार यांनी जळकोटे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!