ना. बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
ना. बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

ना. बनसोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर मतदार संघाचा चौफेर विकास करणारे विकास पुरुष व उदगीर मतदार संघाचे आमदार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या विकास कामाचा धडाका पाहून उदगीर शहर व तालुक्यातील काही सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकाऱ्यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ना.संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या पक्षप्रवेशामध्ये मधुमती कनशेट्टे, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा पंकज कांबळे, कल्याण बिरादार जानापुर, राजु पाटील हाळी, अर्जुन राजे किनी यल्लादेवी, व तादलापुर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अॅड.व्यंकटराव बेद्रे, पंडित धुमाळ , विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, खरेदी विक्री संघाचे भरत चामले, बाजार समितीचे संचालक श्याम डावळे, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले,उद्योजक सुदर्शन मुंडे,तालुका कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, प्रकाश राठोड, उदय मुंडकर, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, अॅड.दिपालीताई औटे , प्रदीप जोंधळे, अभिजीत औटे, इम्तियाज शेख, राजकुमार बिरादार, रोहिदास कुंडगीर, आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!