संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्ष पदी समीर शेख
संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्ष पदी समीर शेख
उदगीर (एल. पी.उगीले) : महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार उदगीर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर – घुगे यांनी गठीत केली. या समितीच्या अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समीर शेख यांची निवड करण्यात आली. या समितीवर सदस्य म्हणून मुकेश भालेराव, श्यामला कारामुंगे, प्रा. राजकुमार जाधव, बालाजी देमगुंडे, प्रभाकर पाटील, उदयसिंह बिसेन, वसंत पाटील, मनोज चिखले, राजकुमार बिरादार यांची निवड करण्यात आली आहे. समीर शेख यांनी यापूर्वी उदगीर तालुका रोजगार हमी योजनेचे अध्यक्षपद तसेच उदगीर तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समिती अशासकीय पद व उदगीर नगर परिषदेचे १० वर्ष सदस्य पद भूषविले आहे. यांच्या या निवडी बद्दल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम डावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, उदगीर शहर अध्यक्ष जानीमिया सय्यद, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे , अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाशमी, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अँड दीपाली ताई औटे, महिला तालुकाध्यक्षा उर्मिलाताई वाघमारे, फेरोज पठाण, अरविंद गिलचे, रतिकांत घोगरे आदीनी अभिनंदन केले आहे .
