छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराचा जागर करावा – राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन

0
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराचा जागर करावा - राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन

छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराचा जागर करावा - राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : कोल्हापूर साम्राज्याचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज हे लोकहितवादी, प्रजाहितदक्ष राजा म्हणून ख्यातकीर्त असून समाजातील दिनदलित,पददलित, उपेक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्यांनी केले म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक विचाराचा जागर करावा असे आग्रही प्रतिपादन यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी केले. ते दि. 26 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय दिनाचे औचित साधून आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक अशोक पेदेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभि प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के डी बिराजदार यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!