महात्मा फुले महाविद्यालयास विचारवंत डॉ. बळीराम पवार यांच्याकडून ग्रंथांची भेट

0
महात्मा फुले महाविद्यालयास विचारवंत डॉ. बळीराम पवार यांच्याकडून ग्रंथांची भेट

महात्मा फुले महाविद्यालयास विचारवंत डॉ. बळीराम पवार यांच्याकडून ग्रंथांची भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : किनगावच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा सामाजशास्त्राचे विचारवंत डॉ. बळीराम पवार यांनी संपादन केलेले अनेक ग्रंथ अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना भेट दिले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख तथा समाजशास्त्राचे संशोधक व विचारवंत डॉ. बळीराम पवार द्वारा संपादित विविध विषयावरील सात ग्रंथ किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी. टी. शिंदे तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना भेट दिले.
विशेष म्हणजे डॉ. बळीराम पवार यांनी विविध सामाजिक विषयावर ग्रंथ संपादित केले आहेत. त्यापैकी ह्युमन राइट्स – संपादक डॉ. बळीराम पवार, सपना मोरे ,रिव्हलोशनरी वुमेन्स ऑफ इंडिया – संपादक डॉ. बळीराम पवार, भारत की पर्यावरण समस्या आणि उपाय – डॉ. बळीराम पवार डॉ. सुलभा लालसरे , एन्व्हायरमेंटल दिग्रेशन अंड सोल्युशन – संपा. डॉ. बळीराम पवार, भारती देवी , मानवाधिकार नूतन प्रवृत्तीय एवमं चुनौतिया – डॉ. बळीराम पवार, डॉ. मनिती कौर आणि अभय विक्रमसिंह,पर्यावरण संरक्षण में महिलाओं का योगदान
संपादक- डॉ.बळीराम पवार/
डॉ.अनिता सोनी , भारत की क्रांतीकारी महिलाएं संपादक – डॉ. बळीराम पवार/डॉ. मनिता कौर विरदी या ग्रंथांचा समावेश आहे.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, भारतातील तसेच विदेशातील विद्वानांनी लिहिलेल्या संशोधनपर लेखांचा समावेश या संपादित ग्रंथामध्ये आहे. हे ग्रंथ विविध विषयावरील संशोधनाकरिता अत्यंत महत्त्वाचे सिद्ध होतील , असे ही ते म्हणाले. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीश ससाणे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर आदींची उपस्थित होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!