राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष पदी मधुमती कनशेट्टे यांची निवड
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष पदी मधुमती कनशेट्टे यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या मधुमती कणशेट्टे यांची उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळेस राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी लातूर जिल्ह्यध्यक्ष मिनाक्षी शिंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्ह्यध्यक्ष अभिजीत औटे यांच्या उपस्थितीत होते. सदरील निवड क्रिडा, युवक व बंदरे मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्ह्य कार्याध्यक्षा दिपाली औटे यांच्या शिफारस नुसार करण्यात आली. या निवडीबद्दल आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर जिल्ह्यध्यक्ष अफसर शेख, कार्याध्यक्ष पंडित धुमाळ, प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेद्रे, अल्पसंख्यांक विभाग जिल्ह्यध्यक्ष शफि हाशमी, सामाजीक न्याय जिल्ह्यध्यक्ष प्रदिप जोंधळे, उदगीर तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, शहर अध्यक्ष जानी सय्यद, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, महिला तालुका अध्यक्ष उर्मिला वाघमारे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले आहे.
