छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती बामणी येथे १५० झाडे लावून साजरी

0
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती बामणी येथे १५० झाडे लावून साजरी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती बामणी येथे १५० झाडे लावून साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय बामणी येथे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. प्रसंगी पंचायत समिती उदगीरचे कृषी विस्तार अधिकारी व्ही.व्ही.अजने , ग्रामसेवक संजीव गुरमे व ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, ग्रामस्थ सुज्ञान पाटील, बसू बिराजदार , ग्रामपंचायत कर्मचारी मुरलीधर लासुने , राम इंचूरे, प्रकाश वल्लिपुरे, संग्राम कांबळे तसेच इंजिनिअर बाळासाहेब बिराजदार , यांनी याप्रसंगी राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक व पर्यावरण विषयक कार्य याबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना वृक्ष लागवड व संवर्धन करून पर्यावरण विषयक समतोल साधला पाहिजे, असे विचार बाळासाहेब बिराजदार यांनी मांडले. व गावकऱ्यांच्या साथीने व कृषी विस्तार अधिकारी व्ही.व्हि. अजने व ग्रामसेवक संजीव गुरमे यांच्या हस्ते गावामध्ये १५० वृक्ष लागवड करून व गावकऱ्यांना या झाडांचे संवर्धन करण्याची शपथ देऊन जयंती साजरी करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!