किनी यल्लादेवी येथे शाहू महाराजांना अभिवादन
किनी यल्लादेवी येथे शाहू महाराजांना अभिवादन
उदगीर (एल. पी.उगीले) : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय किनीयल्लादेवी येथे आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भावी पिढीच्या समोर राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी तथा आदर्शाची बीजारोपण करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे मान्यवरांनी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर, ग्रामसेवक भास्कर निलेवाड, भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ एस डी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जीवनराव बिरादार , अण्णाराव मालशेट्टे , रामकिशन पाटील ,बळीअप्पा शेवाळे ,गोविंद नारागुडे, रामराव लाडके ,नागनाथ मालशेट्टे ,नारायण कांबळे ,सतिश कांबळे ,चंद्रकांत बडगिरे, निवृती देवकत्ते,उमेर शेख, हणमंत कांबळे, उमाकांत मुळे, नागनाथ ससाने, माजी सरपंच डॉ विष्णू कांबळे आदि ग्रामस्थांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी डॉ एस डी कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन चारित्र्यावर आणि महाराजांनी दलित, शोषित, वंचित समाजासाठी आरक्षण कसे मिळवून दिले, याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विष्णू कांबळे यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर यांनी मानले.
