उदगीर रोटरीच्या वतीने आटा चक्कींचे वाटप, “रोटरी की आशा” उपक्रमांतर्गत महिलांना व्यवसायासाठी बळ

0
उदगीर रोटरीच्या वतीने आटा चक्कींचे वाटप, "रोटरी की आशा" उपक्रमांतर्गत महिलांना व्यवसायासाठी बळ

उदगीर रोटरीच्या वतीने आटा चक्कींचे वाटप, "रोटरी की आशा" उपक्रमांतर्गत महिलांना व्यवसायासाठी बळ

उदगीर (एल.पी.उगीले) : रोटरी क्लबच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “रोटरी की आशा” या उपक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वतीने रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तीन आटा चक्कींचे वितरण करण्यात आले.
रोटरी ३१३२ प्रांताच्या प्रांतपाल स्वाती हेरकल यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यावेळी उदगीर शहरातील राधाबाई रुपचंद जैन, निशाबाई पद्मराज बाळे व निलूबाई लक्ष्मण बेलूरे या महिलांना आटा चक्की देण्यात आली. या चक्कीच्या साह्याने या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी व स्वाभिमानासाठी अत्यंत परिणामकारक आणि आशादायी अशा पद्धतीची ही योजना आहे. आटा चक्की वाटप प्रसंगी उदगीर रोटरीच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे, उपाध्यक्ष प्रशांत मांगुळकर, सचिव सरस्वती चौधरी, विशाल जैन, संतोष फुलारी, प्रमोद शेटकार, चंद्रकांत ममदापुरे, रविंद्र हसरगुंडे, अनिल मुळे, सुनीता मदनुरे, प्रा. सुनीता चवळे, डॉ. सुलोचना येरोळकर, आर. के. निजवंते आदी उपस्थित होते.

चौकट

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोटरीच्या वतीने २ एचपी क्षमतेची ताशी २५ किलो धान्य, मसाला दळता येईल. अशी कमर्शियल आटा चक्की शहरातील तिन गरजू महिलांना देण्यात आली आहे. या महिला स्वतःच्या घरात धान्य व मसाले दळून देण्याचे काम करतील. त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना वरदायीनी ठरणार असल्याचे उदगीर रोटरीच्या अध्यक्षा मंगला विश्वनाथे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!