महात्मा फुले महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

0
महात्मा फुले महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

महात्मा फुले महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन ‘ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर तसेच प्रा. एन. एल. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.मारोती कसाब यांनी व आभार एन.एस.एस. चे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ अनिल मुंढे, किरण गुट्टे, डॉ . संतोष पाटील, चंद्रकांत धुमाळे, वामन मलकापूरे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!