रेणुका माता बँकेचे व्यवस्थापक पदी धोंडीहिप्परगेकर
उदगीर (वा.) : रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर च्या उदगीर शाखेचा एकूण वाढता प्रभाव लक्षात घेता, या शाखेसाठी पूर्णवेळ व्यवस्थापक म्हणून बँकिंग क्षेत्रातील जाणकार आणि जिद्दी, चिकाटीचे महेश धोंडीहिप्परगेकर यांची निवड करण्यात आली आहे. रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी च्या उदगीर शाखेने उदगीर शहरात बऱ्यापैकी बस्तान बसवले आहे. व्यापारी वर्गात विश्वासही निर्माण केला आहे. त्यामुळे या शाखेला प्रगतीची संधी आहे. याचा विचार करून महेश धोंडीहिप्परगेकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल विधिज्ञ महेश हिप्पळगे, सुभाष शेरे, प्रा. भीमराव हिप्पलगे, उमाकांत द्याडे आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून महेश धोंडीहीपरगेकर यांचे अभिनंदन केले जात आहे.
