शेतीच्या वादातुन चुलत्याची पुतणी व पुतण्याला जिवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

0
शेतीच्या वादातुन चुलत्याची पुतणी व पुतण्याला जिवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

शेतीच्या वादातुन चुलत्याची पुतणी व पुतण्याला जिवे मारण्याची धमकी ; गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी तांडा येथील एका कुटूंबाच्या वडीलोपार्जित शेतीच्या न्यायालयात प्रलंबीत असलेल्या वाटणीच्या वादातुन एका चुलत्याने फोन वरून आपल्याच पुतणी व पुतण्याला जिवे मारण्याची धमकी दिली असुन पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

   याविषयी सविस्तर माहीती अशी की, तालुक्यातील सांगवी तांडा येथील रहिवाशी असलेले प्रवण देविदास राठोड यांच्या वडीलांची वडीलोपार्जीत गावात जमिन असुन या जमिनिचा वाद अनेक वर्षापासुन अहमदपूर येथे न्यायालयात चालु आहे औरंगाबाद येथे खाजगी नोकरी करीत असलेला पुतण्याने अहमदपूर पोलीसात खालील प्रमाणे तक्रार दिली आहे की, मी प्रणव देवीदास राठोड वय 27 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. सांगवी तांडा ता.अहमदपूर जि. लातुर  समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन जबाब देतो कि, मी सांगवी तांडा  या ठिकाणचा राहणारा असुन मला आई, वडील, बहीण, एक भाऊ आजी असा परिवार असुन माझे वडीलांना 05 भाऊ आहेत. मी खाजगी नोकरी करून कुटुंबाची उपजिवीका भागवितो.  दिनांक 24 जुन रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास मी अहमदपूर येथे कामानिमीत्त आलो असताना माझा चुलता  रावसाहेब पोमा राठोड यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक 9969663264 या मोबाईल क्रमांकावरून माझे घरी असणारा मोबाइल नंबर 9022761443 वर फोन करून  वडीलोपार्जीत शेतीचे वाटणीचे कारणावरून मला व माझी बहीण कुसुम संग्राम चव्हाण हीस शिवीगाळ करून तुम्हाला माज आला आहे. तुम्ही मार खाणार आहात तुम्ही आमच्या नादाला लागु नका नाहीतर तुम्हाला तुमच्या घराबाराला तर खल्लास करतो असे म्हणूण जिवे मारण्याची धमकी दिली आहे. माझा चुलता रावसाहेब राठोड यांनी यापुर्वीही मला व माझे बहीणीला फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तरी शेतीचे वाटणीचे कारणावरून मला व माझे बहीणीला फोनवरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणारे माझे चुलते रावसाहेब पोमा राठोड यांचेवर कायदेशीर कार्यवाही करावी विनंती आहे. अशा आशयाच्या फिर्यादीवरून चुलत्या विरुद्ध अहमदपूर पालीसात भारतीय दंड संहिता 1860 कलम 507 नुसार अदखलपात्र अपराधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत. धमकी देणारा चुलता रावसाहेब पोमा राठोड हा मुलुंड येथे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक या पदावर कार्यरत असल्याचे समजते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!