संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश

0
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत (एन. सी. ई) संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.त्यामध्ये गायकवाड प्रितेश प्रवीण जिल्ह्यात आठवा, शेख नोमान रफिक अहमद जिल्ह्यात नववा, कु.पूर्वी प्रमोद दिक्कतवार केंद्रात पहिली ,किरण संजय चव्हाण केंद्रात दुसरा, भूरे गणेश सदाशिव केंद्रात पहिला , अनुश्री गजानन डुब्बेवार, प्रांजल सचिन मुसने, आकंनगिरे सानवी आनंद ,केंद्रात दुसरा या गुणवंत विद्यार्थ्यांना एन.सी.ई राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेचे जिल्हा समन्वयक योगीराज आमगे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्ञानोबा सुकरे,सहायक सहकार अधिकारी, मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक मीना तोवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 500 रुपये रोख प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. प्रारंभी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल व वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी योगीराज आमगे सरांनी एन.सी.ई परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले .सदरील स्पर्धा परीक्षा ही गणित ,इंग्रजी व विज्ञान या तीन विषयावर घेण्यात येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशा रोडगे यांनी तर सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले व आभार नंदकुमार मद्देवाड यांनी मांनले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!